Home अहमदनगर संगमनेरात मध्यवस्तीत घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद

संगमनेरात मध्यवस्तीत घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद

Sangamner News: पाच तासांच्या प्रयत्नानंतर  अखेर त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश.

Bibtya who entered the middle of Sangamner was finally jailed

संगमनेर : शहरातील मालदाड रोड परिसरातील आदर्श कॉलनीमधील घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये काल भल्या सकाळी अचानक एक बिबट्या घुसला होता. पाच तासांच्या प्रयत्नानंतर  अखेर त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. वन खात्याचे रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  हा बिबट्या सुमारे सात वर्षे वयाचा नर जातीचा होता. त्याची रवानगी रोपवाटिकेत करण्यात आली.

संगमनेर शहरातील उपनगरालगत गेल्या काही दिवसांपासून बिबटे खुलेआम फिरत आहेत. शहरातील देवाचा मळा, कोल्हेवाडी रोड, पंचायत समिती परिसर, गुंजाळ नगर या भागामध्ये बिबट्याचे अनेकदा दर्शन होत होते. वनखात्याने प्रयत्न करूनही हे बिबटे खुलेआम फिरत आहेत. शहरातील मालदाड रोड परिसरात काल एक बिबट्या फिरत होता. नाशिक- पुणे रस्त्यावरील मालपाणी लॉन्सच्या आवारात फेरफटका मारल्यानंतर हा बिबट्या मालदाड रोडवरील आदर्श कॉलनी परिसरातील मालदाड रोड परिसरातील विलास मानकर यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. घरामध्ये बिबट्या पाहताच माणसांची चांगलीच धावपळ उडाली.

 बिबट्या आल्याची माहिती समजताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. काही जागृत नागरिकांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनक्षेत्रपाल सागर केदार हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हेही आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले.

बराच वेळ हा बिबट्या पत्र्याच्या शेडमधून बाहेर यायचे नाव घेत नव्हता. यानंतर वनखात्याने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला.वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने शेडला जाळी लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन मारण्यात आले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर वनखात्याला दुपारी बिबट्याला पकडण्यात यश आले.

वनरक्षक संतोष पारधी, रवींद्र पडोळे, संतोष बोऱ्हाडे, दिपक शिरतार, नवनाथ व विलास गोफणे, तसेच वनपाल देवीदास जाधव, सुहास उपासनी, रमेश पवार, वनरक्षक, गजानन पवार, हरिश्चंद्र जोजार, रामकृष्ण सांगळे यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबविले.

Web Title: Bibtya who entered the middle of Sangamner was finally jailed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here