राजूर परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद
Rajur News: गेल्या महिनाभरापासून राजूर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात राजूर वन विभागाला यश आले आहे.
अकोले: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर परिसरात गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यास राजूर वनविभागाला यश आले आहे. .१५ दिवसांपूर्वी निळवंडे परिसरातील या बिबट्याच्या हाल्यात 62 वर्षीय वृद्ध महिला मृत्यूमुखी पडली होती. यात रखमाबाई तुकाराम खडके यांना त्यांच्या राहत्या छपराच्या दरवाजातून लांब ओढत नेत पहाटेच्या सुमारास फडशा पाडला होता, त्याच परिसरात या बिबट्याने वारंवार हल्ले चढवले होते, अनेक शेळ्या मृत्युमुखी पडल्या होत्या. राजूर परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यात गिरीश बोऱ्हाडे यांच्या पाळीव कुत्र्याचा ही मृत्यू झाला होता. राजूर परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.
राजूर परिसरात हल्ले वाढत चालले होते, वनविभागाने राजूरकर यांना वारंवार सतर्कतेचे आवाहन केले होते. बिबट्याचे होणारे हल्ले हे दृश्य बघता राजूर वनविभागाने ठीक-ठिकाणी पिंजरे देखील लावले होते, मात्र यात राजूर वनविभागाला काही काळ अपयश मिळाले नव्हते.
Business Idea in Marathi | कमी खर्चात घरबसल्या करता येणारे नवीन बिजनेस | Low Investment Business
अखेर काल रात्री दिगंबर रोड परिसरातील लहामगे कुटुंबाच्या उसाच्या शेतात राजूर वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता, काही तासातच एक बिबट्या जेरबंद करण्यास राजूर वनविभागाला यश मिळाले आहे. बिबट्या जेरबंद झाले असल्याचे समजताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी पिंजरा लावण्यात आलेल्या ठिकाणी धाव घेत या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.जे रबंद बिबट्या बघण्यासाठी राजूरकरांची मोठी गर्दी बघण्यास मिळाली.
Web Title: Bibatya who was roaming in Rajur area was finally jailed
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App