Home नाशिक बिबट्याने आईसमोरच चार वर्षांच्या बालिकेला शेतात ओढून नेत ठार

बिबट्याने आईसमोरच चार वर्षांच्या बालिकेला शेतात ओढून नेत ठार

Breaking News  | Sinner Bibatya Attack: शेतातील काम करून घरी परतत असताना शेतात लपून बसलेल्या बिबट्याने आईसमोरच तिच्या चार वर्षांच्या बालिकेला शेतात ओढून नेत ठार.

Bibatya drags four-year-old girl to field, kills her in front of her mother

सिन्नर:  तालुक्यातील गोंदे शिवारात शेतातील काम करून घरी परतत असताना शेतात लपून बसलेल्या बिबट्याने आईसमोरच तिच्या चार वर्षांच्या बालिकेला शेतात ओढून नेत ठार केल्याची घटना शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. जान्हवी सुरेश मेंगाळ (४) असे मृत बालिकेचे नाव आहे.

आईच्या डोळ्यासमोर तिच्या मुलीला बिबट्याने ओढून नेताच आई व त्यांच्यासोबत असलेल्या मजुरांनी आरडाओरड करत ज्वारीच्या पिकात धाव घेतली. त्यांच्या आरडाओरडमुळे बिबट्याने जान्हवीला सोडून तेथून पळ काढला. मात्र, बिबट्याने जान्हवीच्या मानेला पकडल्याने मानेला खोलवर जखमा झाल्या होत्या. सोबतच्या मजुरांनी तात्काळ शेतमालक शरद तांबे व प्रकाश तांबे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत जान्हवीला दुचाकीवरून उपचारासाठी सिन्नरला नेले . सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी जान्हवीला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती वनविभाग व वावी पोलिसांना समजतात त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वर्षभरापूर्वी याच भागात बिबट्याने एका आठ वर्षाच्या मुलावर हल्ला करून त्यास ठार केले होते. पुन्हा अशीच घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Breaking News: Bibatya drags four-year-old girl to field, kills her in front of her mother

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here