Home संगमनेर संगमनेर: शेतात झोपलेल्या मेंढपाळ महिलेवर बिबट्याचा हल्ला

संगमनेर: शेतात झोपलेल्या मेंढपाळ महिलेवर बिबट्याचा हल्ला

Breaking News | Sangamner:  शेतात झोपलेल्या मेंढपाळ महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना.

Bibatya attacked a shepherd woman who was sleeping in the field

संगमनेर : संगमनेर तालुक्यात बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहे. गुंजाळवाडी परिसरात पती पत्नीवर हल्ला, निमगाव टेंभी येथे चिमुकल्यावर हल्ला केल्याच्या घटनेनंतर आता पठार भागातून आणखी एक घटना समोर आली आहे.

शेतात झोपलेल्या मेंढपाळ महिलेवर बिबट्याने हल्ला केला, यात ती जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. २३) पहाटे पाच वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर रस्त्यालगत असलेल्या शेतात घडली. मीराबाई भास्कर लोहटे (रा. मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

घारगावातील शेतकरी सुभाष शिवाजी आहेर यांच्या शेतात मेंढपाळांचा मेंढ्यांसह रात्रीचा मुक्काम होता. रविवारी पहाटे बिबट्याने येथे मेंढ्यांच्या बाजूला झोपलेल्या मेंढपाळांच्या कुटुंबातील महिलेच्या डाव्या पायाला पंजा मारून ओढण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड झाल्याने बिबट्या पळून गेला. हल्ला केल्याची माहिती मिळताच वनरक्षक किसन सातपुते घटनास्थळी पोहोचले.

घारगाव येथील अकलापूर रस्ता परिसरात दुचाकी चालकांना अनेकदा बिबट्यांचे दर्शन झाले आहे. या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. वनविभागाने पाहणी करून बिबट जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Bibatya attacked a shepherd woman who was sleeping in the field

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here