Home संगमनेर भोजापूरही ओव्हरफ्लो, म्हाळुंगी नदी प्रवाही; धरणातून विसर्ग सुरू

भोजापूरही ओव्हरफ्लो, म्हाळुंगी नदी प्रवाही; धरणातून विसर्ग सुरू

Breaking News | Sangamner: म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरण पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पूर्ण क्षमतेने भरले.

Bhojapur also overflows, Mhalungi river flows

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील अवर्षणप्रवण निमोण भागाला वरदान ठरलेले म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरण पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी (दि. 5 ऑगस्ट) सकाळी दहा वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या सांडव्याद्वारे 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून म्हाळुंगी नदी प्रवाही झाली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

सिन्नर तालुक्यातील भोजापूर पट्ट्यातील म्हाळुंगी नदीवर असलेल्या भोजापूर धरणाची एकूण साठवण क्षमता 483 दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा 361 दशलक्ष घनफूट इतका असतो. पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भोजापूर धरणात पाण्याची मोठी आवक झाली. भोजापूर धरणाच्या पाण्यावरच सिन्नर व संगमनेर भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे भोजापूर धरण भरण्याची सर्वांना अपेक्षा होती. पश्चिम पट्ट्यात विश्रामगड परिसरात म्हाळुंगी नदीचे उगमस्थान आहे.

शुक्रवार पासून उगमस्थानात जोरदार पाऊस सुरु झाल्याने नदीला पहिल्यांदा पूर आला होता. त्यामुळे भोजापूर धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होण्यास सुरुवात झाली होती. रविवारी सायंकाळी धरणात 80 टक्के पाणीसाठा झाला होता. सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास 483 दशलक्ष घनफूट क्षमता असलेले भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. धरणातील पाणीसाठा तसेच सांडव्याद्वारे वाहणारे पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची दिवसभर गर्दी सुरु होती. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाले असले तरी परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

Web Title: Bhojapur also overflows, Mhalungi river flows

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here