भंडारदरा: शेंडीतुनच लालपरी माघारी, चालक आणि वाहक यांची मनमानी ; प्रवाशाचा संताप
शेंडीतुनच लालपरी माघारी चालक आणि वाहक यांची मनमानी ; प्रवाशाचा संताप
भंडारदरा: – आठवडे बाजाराच्या दिवशी अकोले आगाराच्या लालपरीने शेंडीतुनच माघारी जाणे पसंत केल्याने बाजारासाठी आलेल्या अनेक आदिवासी प्रवाशांना कितीतरी वेळ पावसात घाटघर परिसरात जाण्यासाठी लालपरीची वाट पहावी लागल्याने प्रवाशांत संताप लाट पसरली आहे.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
शुक्रवारी शेंडी येथील आठवडे बाजार असल्याकारणाने घाटघर, साम्रद, लव्हाळवाडी, उडदावणे, पांजरे भागातुन अनेक आदिवासी बांधवांनी बाजारासाठी गर्दी केली होती. अकोले आगाराची अकोल्यातुन घाटघरात जाण्यासाठी दुपारी सुटणारी बस शेंडी येथे आले. “यानंतर चालक आणि वाहक यांनी संगनमताने अकोले आगाराची कोणतीही परवानगी न घेता शेंडीतुनच माघारी नेली. चालक आणि वाहकाच्या या मनमानी वागणुकीमुळे कित्येक प्रवाशांना पावसातच बसमधुन खाली उतरुन दिले गेले. बाजारासाठी आलेल्या अनेक प्रवाशांनी संध्याकाळी मुक्कामी जाणाऱ्या बससाठी ताटकळत उभे राहण्याची वेळ आली . यामुळे आदिवासी प्रवाशांमध्ये महामंडळाच्या कारभाराबद्दल संतापाची लाट उसळली आहे. बाजाराचा दिवस आणि घाटघरीपर्यंत बस तुडुंब भरले. इतके प्रवाशी असतानांही बसमधुन प्रवाशांना खाली उतरुन राजुरला बस फिरवत रिकामी नेणे ही महामंडळासाठी तोटयाची सेवा नाही का? एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी की, चालक आणि वाहक यांच्या सेवेसाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा