Home अकोले भंडारदरा धरण ९५ टक्के तर निळवंडे धरण ८३ टक्के पाणी

भंडारदरा धरण ९५ टक्के तर निळवंडे धरण ८३ टक्के पाणी

 भंडारदरा धरणातील पाणीसाठा 10468 दलघफू (95 टक्के) झाला आहे. निळवंडेत काल सायंकाळी 6943 दलघफू (83.37 टक्के) पाणीसाठा.

Bhandardara dam 95 percent and Nilavande dam 83 percent water

भंडारदरा:  नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा 10468 दलघफू (95 टक्के) झाला आहे. निळवंडेत काल सायंकाळी 6943 दलघफू (83.37 टक्के) पाणीसाठा होता. या धरणातून प्रवरा नदीपात्रात 1568 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

पाणलोटात पाऊस कमी झाल्याने आवक कमालीची घटली आहे. भंडारदरात काल केवळ 35 दलघफू पाण्याची आवक झाली. आढळा पाणलोटातही पाऊस नसल्याने पाण्याची आवक थांबली आहे. काल सकाळी 1060 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 869 दलघफू (81.98 टक्के) झाला होता. जिल्ह्याच्या इतर भागातूनही मान्सून गायब झाल्याने नगरकरांची चिंता वाढली आहे.

Web Title: Bhandardara dam 95 percent and Nilavande dam 83 percent water

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here