प्रेमात ठार! प्रेयसीवर अमानुष अत्याचार, जाळून टाकले अन् विवस्त्र अवस्थेत; नर्स हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!
Chhatrapati Sambhajinagar Crime: पीडितेला जादू दाखवण्याच्या बहाण्याने पीडितेचे हात बांधले, नंतर डोळे बंद करायला लावत ,तिची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक माहिती.
छत्रपती संभाजीनगर: येथील नर्स मोनिकाच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी इरफानने प्रेम प्रकरणातून मोनिकाची हत्या केल्याची माहिती यापूर्वीच समोर आली होती. मात्र आता पोलिसांच्या तपासात मोनिकाची हत्या कशी झाली याचा खुलासा करण्यात आला आहे. आरोपीने पीडितेला जादू दाखवण्याच्या बहाण्याने पीडितेचे हात बांधले, नंतर डोळे बंद करायला लावत ,तिची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मोनिका सुमित निर्मल असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. तर पशेख इरफान शेख पाशा असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली. मोनिका ही जालना येथे राहत होती. दररोज ती कामानिमित्त संभाजीनगरला ये-जा करत होती. तसेच ती रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावायची.
मूळची जालना येथील रहिवासी असलेली मोनिका छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. तिचे लग्न झाले होते, मात्र तिचा नवऱ्यासोबत वाद सुरु होता. याच काळात तिची संभाजीनगरमधील एका पार्किंगमध्ये काम करण्याऱ्या इरफानसोबत ओळख झाली. त्यानंतर, मैत्रिचे रूपांतर प्रेमात सुरू झाले. दीड वर्षांपासून दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दोघंचं तासनतास फोनवर बोलणं व्हायचं. मात्र अलीकडच्या काही काळात दोघांच्या नात्यात दुरावा आला होता.
मोनिकाने इरफानचा फोन उचलणे बंद केले. १८ जानेवारीला इरफानने मोनिकाला अनेक वेळा फोन केले. मात्र तिने फोन न उचल्याने इरफानला राग आला होता. मोनिका आधीसारखी वागत नव्हती, या रागातून त्याने मोनिकाची हत्या करण्याचा कट रचला होता अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली. ६ फेब्रुवारी रोजी घटनेच्या दिवशी मोनिका छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरून तपोवन एक्सप्रेसने लासूर रेल्वे स्थानकावर आली. इरफानने इथे तिची वाट बघत होता. यावेळी तो दारूच्या नशेच होता.
मोनिका आल्यानंतर दोघेही दुचाकीने लासूर रेल्वे स्थानकाजवळील स्मशानभूमी परिसरातील एका पडक्या घराजवळ गेले. याठिकाणी काही वेळ दोघंही गप्पा मारत बसले. पण इरफानचा राग कमी झाला नव्हता. त्यामुळे त्याने जादू दाखवतो, असं सांगून मोनिकाचे हात बांधले. तसेच डोळे बंद करायला सांगितले. पुढच्या क्षणात आपल्यासोबत काय घडणार आहे? याची कसलीही कल्पना नसलेल्या मोनिकाने आरोपीवर विश्वास ठेवून डोळे बंद केले.
आरोपीने याचा फायदा घेतला आणि मोनिकाचा गळा आवळला. ही हत्या करण्यापूर्वी आरोपीने घटनास्थळी एक खड्डा खोदून ठेवला होता. पुरावे नष्ट करण्यासाठी, आरोपीने पीडितेचे कपडे काढले आणि जाळून टाकले आणि विवस्र अवस्थेत पुरलं. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेच्या अंगावरील दागिने काढून घेतले आणि ४८ हजार रुपयांना विकले. याबाबतचा खुलासा आरोपीनं दिला आहे. अधिक चौकशी पोलीस करीत आहे.
Web Title: Beloved brutally abused, burnt and naked