धक्कादायक! तब्बल 6 तास अत्याचार, सामूहिक बलात्काराने बीड हादरलं
Beed Crime: आळीपाळीने अत्याचार (Gang Rape) करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. पुढे हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला ब्लॅकमेल करत सतत तिच्यावर अत्याचार.
बीड: बीड जिल्ह्यातील माजलगाव शहर ठाण्यात सात जणांविरोधात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रुमवर बोलावून एका रिक्षाचालकाने तिच्यावर अत्याचार करत त्याचा व्हिडीओ (VIDEO) तयार केला. पुढे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल सात जणांनी तिच्यावर 2014 ते 2021 अशी सात वर्षे आळीपाळीने अत्याचार केला. मात्र त्यानंतर आता पुन्हा तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याने हतबल झालेल्या महिलेने पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरुन माजलगाव शहर ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप पिंपळे (रा.कबाडगल्ली बीड), बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही आहेर धानोरा ता.बीड) यांच्यासह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीतेने दिलेलेया फिर्यादीनुसार, 2014 मध्ये ती प्रवास करत असताना ती तिची पर्स संदीप पिंपळे याच्या रिक्षात विसरली होती. दरम्यान पर्स परत देण्याच्या बहाण्याने पिंपळेने महिलेला बीड शहरातील कबाड गल्लीतील एका खोलीवर बोलावले. महिला तिथे आल्यावर पिंपळे याने तिच्यावर अत्याचार केला. संतापजनक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. पुढे हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला ब्लॅकमेल करत सतत तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे पुढे त्याने त्याचा नातेवाईक असणाऱ्या गोरख इंगोले याच्यासोबतही पीडित महिलेला बळजबरीने संबंध ठेवण्यास भाग पाडले. तर पुढे गोरख इंगोलेनेही महिलेला ब्लॅकमेल करुन तिच्यावर सतत अत्याचार केला. 2015 साली गोरख इंगोलेचा भाऊ बालाजी इंगोले याने देखील महिलेस ब्लॅकमेल करुन तिच्यावर अत्याचार केला.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत गोरख इंगोले याने 2020 मध्ये जबरदस्तीने पीडितेला दुचाकीवर बसवून जरुड ते हिवरा पहाडी रोडलगत असणाऱ्या घाटात नेले. तिथे गेल्यावर त्याच्या 4 मित्रांकडून महिलेवर आळीपाळीने तब्बल 6 तास तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दरम्यान महिला गर्भवती राहिली. त्यामुळे गोरख इंगोले याने जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. नेहमीच्या या सर्व अत्याचाराला कंटाळून पीडित महिला माजलगावला आली. तिथे एका हॉटेलमध्ये नोकरी करु लागली. पण येथेही या तिघांनी येऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे वारंवारचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्याने पीडितने माजलगाव शहर ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Beed was shaken by torture and gang rape for about 6 hours
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App