Home बीड सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं

सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं

Beed Sarpanch Accidental Death: परळी तालुक्यातील आणखी एका सरपंचाचा अपघाती मृत्यू झाला.

Beed was shaken again by the Sarpanch's death

बीड: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यासह राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना आता पुन्हा एकदा बीडमधील परळी तालुक्यातील आणखी एका सरपंचाचा अपघाती (Accident) मृत्यू झाला आहे. परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेची अवैध वाहतूक आणि व्यवसाय होत असल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. याच राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सौंदना गावचे विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की, क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चुराडा झाला.

या अपघाताची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित टिप्पर चालकाला अटक करण्यात आली आहे. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर सदर अपघात झाला.  मिळालेल्या माहितीनुसार, सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे परळीच्या दिशेने जात होते. यावेळी शनिवारी (दि. ११ जानेवारी) रात्री साडे आठच्या सुमारास मिरवट फाट्यावर त्यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिली. या धडकेत क्षीरसागर गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल.

या घटनेवर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली असून हा अपघात की घातपात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, सरपंच क्षीरसागर यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा घातपात होता का? याची चौकशी झाली पाहीजे. संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतरही अवैध राखेची वाहतूक करणारे टिप्पर बंद झालेले नाहीत. याला परळी पोलीस, औष्णिक विद्युत प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार आहेत.

Web Title: Beed was shaken again by the Sarpanch’s death

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here