Home बीड बीड निघृण हत्येच्या घटनेने हादरले! हॉटेल मालकाची हत्या

बीड निघृण हत्येच्या घटनेने हादरले! हॉटेल मालकाची हत्या

Breaking News  Beed Murder Crime: बिल देण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून हॉटेल मालकाची हत्या.

Beed shaken by brutal murder Hotel owner murdered

 बीड: जिल्ह्यातील गुन्हेगारी संपायचं काही नाव घेत नसताना माजलगाव शहरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आधी भाजपच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा निघृण हत्या, नंतर चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाची हत्या तर आता बिल देण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून हॉटेल मालकाची हत्या करण्यात आली आहे. महादेव गायकवाड (वय 54 वर्षे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील माजलगाव पुन्हा एकदा निघृण हत्येच्या घटनेने हादरले आहे. हॉटेल (ढाबा) मालक व त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (20 एप्रिल) रात्री उघडकीस आली. यात गंभीर जखमी असलेल्या बाप-लेकावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, यात महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आशुतोष महादेव गायकवाड याच्यावर उपचार सुरू आहेत.

माजलगाव शहरापासून 4 किलोमिटर अंतरावर नागडगाव पाटी कॉर्नरवरील गावरान ढाबा मालक महादेव गायकवाड यांची एका टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली. महादेव गायकवाड (रा. मंजरथ रोड, माजलगाव) हे रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे बसले होते. तितक्यात माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील एका टोळक्याने बिल देण्यावरून महादेव गायकवाड यांच्याशी वाद घातला. वाद वाढला असता टोळक्याने महादेव गायकवाड यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात महादेव गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. टोळक्याने महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष याच्यावरही प्राणघातक हल्ला केला.

दोघांना गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, महादेव गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला तर मुलगा  आशुतोष महादेव गायकवाड याच्यावर उपचार सुरू आहेत.

Breaking News: Beed shaken by brutal murder Hotel owner murdered

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here