बीड पुन्हा हादरले! दोन सख्ख्या भावांची निर्घुण हत्या
Beed Crime News: आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली.
बीड : बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संतापाची लाट असतानाच तसेच परळीमध्ये सरपंचाचा अपघाती मृत्यूनंतर आता आणखी एका घटनेनं बीड हादरलं आहे. बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अजय भोसले आणि भरत भोसले असं या सख्ख्या भावांचे नाव असून त्यांची हत्या नातेवाईकांनीच केली आहे. या प्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हत्या करण्यात आलेले दोघे सख्खे भाऊ पारधी समाजातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अजय आणि भरत भोसले यांचा नातेवाईकासोबत जुना वाद होता. या वादातून काल (16 जानेवारी) रात्री निर्घृणपणे या दोघांची हत्या करण्यात आली. हे दोघे भाऊ बीड नगर हद्दी वरील आष्टी तालुक्यातील हातवळण या मूळ गावचे आहेत. या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली. दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
Web Title: Beed Crime brutal murder of two Sakhkhya brothers
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News