ओतूर: चारित्र्याच्या संशयावरून विटेने मारहाण, पत्नीचा मृत्यू
Breaking News | Pune Crime: पतीने डोक्यात विटांनी मारहाण केल्याने जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू (Death) झाल्याची घटना.
ओतूर | जुन्नर: तळेरान येथे पतीने चारित्र्याच्या संशयावरून विटेने मारहाण केल्याने पत्नी देवकाबाई कैलास हिलम (वय ३३) यांचा सोमवारी (ता.८) मृत्यू झाला. याप्रकरणी ओतूर पोलिसांनी कैलास जयराम हिलम (वय ३८ रा. तळेरान, बोरीचीवाडी, ता. जुन्नर) यास अटक केली आहे.
याबाबत दादाभाऊ मुकणे (रा.खिरेश्वर ता.जुन्नर) यांनी ओतूर पोलिस फिर्याद दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, , कैलास हे पत्नी देवकाबाईसह वसार (ता.अंबरनाथ. जि. ठाणे) येथे वीट भट्टीवर मजुरी करत होते. कैलास याने चारित्र्यावर संशय घेऊन देवकाबाई हिस एक एप्रिल ते सात एप्रिलपर्यंत वसार येथे लाथा बुक्क्यांनी वेळोवेळी मारहाण केली होती. त्यानंतर हे पती-पत्नी रविवारी (ता.७) रात्री ८ सुमारास (तळेरान, बोरीचीवाडी, ता.जुन्नर) या ठिकाणी आले होते. तेथे ही पुन्हा कैलास याने डोक्यात विटांनी मारहाण केल्याने जखमी झालेल्या देवकाबाई हिचा मृत्यू (Death) झाला आहे.
Web Title: Beating with a brick over suspicion of character, death of wife
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study