Home अकोले अभिनव शिक्षण संस्थेत मारहाण, गुन्हे दाखल

अभिनव शिक्षण संस्थेत मारहाण, गुन्हे दाखल

Breaking News | Akole Crime: अभिनव शिक्षण संस्थेत किरकोळ वादातून मारहाण, परस्पर विरोधी गुन्हे दाखल.

Beating in Abhinav Education Institute, crime filed

अकोले: मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त, अहमदनगर यांनी संस्थेची कार्यकारिणीच अवैध असल्याचा निर्णय दिला व अनुक्रमे अध्यक्ष पदावर लिज्जत उद्योगसमुहाचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते यांची तर सेक्रेटरी पदावर भाऊसाहेब नाईकवाडी यांची  नेमणुक करण्यात आली. नुतन झालेले सेक्रेटरी बी के नाईकवाडी आणि कार्यालयीन अधिक्षक दिलीप मंडलिक यांच्यात झालेला वाद निर्माण झालेला पाहायला मिळाला.  नेमकी काय दाखल केलेल्या गुन्हाच्या अन्वये.

अभिनव शिक्षण संस्थेचे रेकॉर्ड व कार्यालयाच्या चाव्या न दिल्याच्या रागातून दिलीपकुमार मंडलिक यांना मारहाण करण्यात आली.  नाईकवाडी यांनी शालेय  रेकाॅर्ड व हालचाल रजिस्टर बँक बॅलन्स इत्यादी माहिती मागितली असता सध्या मला सदर माहिती देता येणार नाही अशा कारणाने भाऊसाहेब नाईकवाडी यांच्यासह अन्य ५-६ जणांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत नाईकवाडी व अन्य  यांच्याविरोधात भारतीय दंडसहिंता १८६० अंतर्गत ३२३, ५०४,५०६,१४३,१४७,१४९ कलमन्वयावे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

तर दिलीप मंडलिक यांच्या विरोधात नाईकवाडी यांनी कर्मचारी मंडलिक यांच्या सहाय्याने संस्थेत विविध माध्यमांच्या आधारे भ्रष्टाचार सुरु असुन, न्यायालयाच्या आदेशाने आमची नियुक्ती झाल्याने,  आमच्या कार्यकाळात असा भ्रष्टाचार होऊ नये म्हणुन आम्ही प्रशालेत गेलो असता शालेय काही दप्तराची मागणी केली असता, आमच्याकडे इथुन पुढे कुठल्याही दप्तराची मागणी करायची नाही असे बोलत हात पिरगाळत दुखापत केली व अन्य ५-६ जणांनी येत मारहाण केली व परत अभिनव शिक्षण संस्थेत पाऊल टाकल्यास जिवे मारून टाकु अशी धमकी दिल्याने मंडलीक व अन्य ५-६ यांच्या विरोधात ,भारतीय दंडसहिंता १८६० अंतर्गत ३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९ कलमन्वयावे गुन्हे दाखल करण्यात आला आहे .

सध्या अकोले तालुक्यात ऎरणीवर आलेला  विषय म्हणजे “अभिनव शिक्षण संस्था “, सर्वच आजी आणी माजी यांच्याच सहकार्यातुन उभी राहिलेली , अन कर्मचारी “वर्ग” यांच्या प्रयत्नातुन अभिनवचे नाव अभिनवपणे  टिकुन राहिलेल्या कर्मचारी बांधव या सर्वांमध्ये समन्वय तातडीने होणे हे  फार महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Beating in Abhinav Education Institute, crime filed

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here