महिलेला काठीने मारहाण; कोयत्याने मारण्याची धमकी
Rahuri News: बांधावरील झाड काढून घेण्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून मंगल सिनारे या महिलेला काठीने मारहाण.
राहुरी : बांधावरील झाड काढून घेण्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून मंगल सिनारे या महिलेला काठीने मारहाण करून कोयत्याने मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना दि. २७ ऑगस्ट रोजी राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे घडली.
मंगल पोपट सिनारे वय ४५ वर्षे (रा. निंभेरे) या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतात भुईमुगाची खुरपणी करीत होत्या. तेव्हा तेथे आरोपी आले व म्हणाले की, बांधावरील झाडे काढून घ्या. त्यावेळी मंगल सिनारे आहे.
म्हणाल्या की, भुईमुगाचे पीक काढले नंतर मी झाडे काढून टाकीन. त्यावर आरोपी सरला सिनारे हिने मंगल सिनारे यांचे हात धरले आणि इतर आरोपींनी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच कोयत्याने मारून टाकू, अशी धमकी दिली.
मंगल सिनारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सरला सुधाकर सिनारे, स्वप्निल दादासाहेब सिनारे, तुषार दादासाहेब सिनारे, सागर सुधाकर सिनारे, दादासाहेब मुरलीधर सिनारे, शोभा दादासाहेब सिनारे (सर्व रा. निंभेरे) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Beating a woman with a stick; Threatened to kill