Home क्राईम संगमनेर: किरकोळ कारणावरून कुर्‍हाडीने मारहाण, आरोपी पोलीस ठाण्यातून पसार

संगमनेर: किरकोळ कारणावरून कुर्‍हाडीने मारहाण, आरोपी पोलीस ठाण्यातून पसार

Sangamner Crime: जुन्या भांडणाच्या कारणातून एकाजणाने कुर्‍हाडीने मारहाण (Beaten) केल्याची घटना तालुक्यातील घुलेवाडी येथे घडली. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल.

Beaten with an ax for a minor reason, the accused 

संगमनेर: जुन्या भांडणाच्या कारणातून एकाजणाने कुर्‍हाडीने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील घुलेवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी अनिल उर्फ दीपक सोनू पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अनिल रणसूर (रा. घुलेवाडी, ता.संगमनेर) त्याच्या घरासमोर अनिल उर्फ दीपक सोनू पवार हा राहतो. या दोघांमध्ये पाच महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाले होते. काल रात्री 9 वाजेच्या सुमारास अनिल हा गप्पा मारत असताना दीपक सोनू पवार हा आला, त्यावेळी त्याच्या हातात कुर्‍हाड होती. यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. दीपक पवार याने त्याच्या हातातील कुर्‍हाडीने वार केला.

या हाणामारीबाबत माहिती समजताच स्थानिक नागरिक घटनास्थळी आले. त्यांनी जखमीला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत अनिल रणसूर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दीपक सोनू पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान या हाणामारीतील अनिल रणसूर यांना मोठी जखम झाल्याने आरोपी अनिल पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यामध्ये त्याला बसविण्यात आले. मात्र, त्याच्या मेडिकलची तयारी करत असतानाच त्याने पोलीस ठाण्यातून पलायन केले. ताब्यातील आरोपी पळाल्याने उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांची चांगली धांदल उडाली.

Web Title: Beaten with an ax for a minor reason, the accused 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here