इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
बारामती | Baramati: इंस्टाग्राम वरून झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण (Sexual abuse) केल्याची घटना बारामती येथील झारगडवाडी येथून समोर आली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील युवक अविनाश गुलाब मासाळ याची पीडित मुलगी (वय-२०) इंस्टाग्राम वरून ९ महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. इंस्टाग्रामवरून संवाद साधत मैत्री अन प्रत्यक्ष दोघांमध्ये भेटीगाठी देखील झाल्या.
भेटी गाठीतून प्रेमसंबंध निर्माण झाले. याचमधून त्यांचे शारीरिक संबंध आले, युवकाने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध प्रस्थापित केले. २०२१ ते एप्रिल २०२२ पर्यत यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. आणि आता लग्नाचे गोष्ट केली असता सदर युवक त्या मुलीला धमकी देऊ लागला होता. सतत लग्न करण्यास नकार देत असत.
त्यांची भेट बारामतीमध्ये लॉजला झाल्याने सदर विरुद्ध भादवि कलम ३७६ प्रमाणे व कलम ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. याप्रकरणी अधिक तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.
Web Title: Baramati Sexual abuse of a minor girl