Bappi Lahiri Passes Away: ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लहिरी यांचं निधन
मुंबई | Bappi Lahiri Passes Away: हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवणारे ज्येष्ठ गायक बप्पी लहिरी यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचे ६९ वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून बप्पी लहिरी यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
Press Trust of India Tweet: Singer-composer Bappi Lahiri dies in Mumbai hospital, says doctor
बप्पी लहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५३ झाला होता. १९७३ सालच्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाद्वारे बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सुरुवात केली होती. १९८२ मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या या चित्रपटातील गाण्यांमुळे बप्पी लहिरी प्रकाशझोतात आले. त्यानंतर बप्पी लहरी यांनी अनेक चित्रपटांमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून काम केलेले आहे.
Web Title: Bappi Lahiri Passes Away