बांगलादेशी महिलांचा वापर वेश्या व्यवसायासाठी, ऑनलाईन पैसे पाठवून लॉजवर ….
Breaking News | Mumbai Crime: हॉटेल सत्यम हॉस्पिटॅलिटी मध्ये बांगलादेशी महिलांचा वापर वेश्या व्यवसायासाठी होत असल्याची माहिती. गुन्हे शाखेने बनावट ग्राहक पाठवून छापा, 3 फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
नवी मुंबई: शिरवणे गावातील हॉटेल सत्यम हॉस्पिटॅलिटी मध्ये बांगलादेशी महिलांचा वापर वेश्या व्यवसायासाठी होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करून, त्यातून 5 महिलांची सुटका केली असून, 3 फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
गुन्हे शाखेने वेश्याव्यवसायातून 5 बांगलादेशी महिलांची सुटका केली आहे. हॉटेल सत्यम हॉस्पिटॅलिटी मध्ये बांगलादेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानंतर सदर माहितीची सहानिशा करण्यासाठी गुन्हे शाखेने बनावट ग्राहक पाठविण्यात आले.
शाहीन शिराजुल मंडल याला ऑनलाईन पैसे पाठवून लॉजवर गेले असता, मिळालेल्या माहितीची खात्री होताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने, सदर ठिकाणी छापा मारून 5 बांगलादेशी महिलांची या वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. ग्राहकाला महिला दाखवणारा वेटर अरविंदकुमार देवलाल जाधव, या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर वेश्याव्यवसायासाठी ऑनलाइन पैसे स्वीकारणारा आरोपी साहिल उर्फ शाहीन शिराजुल मंडल, व महिलांना वेश्याव्यवसायासाठी लॉजवर पाठवणारा आरोपी शंभू मुनीलाल उपाध्याय या दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
नेरुळ परिसरात चाललेल्या या अवैद्य धंद्यांवर स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने, या हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथक हे धाड मारून नशा मुक्त नवी मुंबई मोहिमेला बळकटी देत आहेत. तर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष येथील लॉजवर कारवाई करून वेश्याव्यवसायातून महिलांची सुटका करताना दिसून येत आहे. मात्र नेरुळ पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.
Web Title: Bangladeshi women used for prostitution, sent money online to lodges