बाळासाहेब थोरात यांचे मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य म्हणाले….
Breaking News | Maratha Resrvation: इतर आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे- बाळासाहेब थोरात.
संगमनेर आरक्षणाचा विषय हा न्यायालयाचा येतो, त्यामुळे त्यावर बोलण्याच्या मर्यादा आहेत. परंतु, हे आंदोलन म्हणजे लोकचळवळ आहे. समाज संघटित होतो आहे, तेव्हा सरकारने त्यांच्या मागण्यांना मान देऊन तातडीने आरक्षण लागू केले पाहिजे. ओबीसी, आदिवासी व मागासवर्गीय यांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
संगमनेर शहरात बुधवारी (दि. २७) थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी होऊन मराठा समाजातील गरीब घटकांच्या जीवनात आनंद व समृद्धी निर्माण व्हावी. सध्या देशात व राज्यात भाजपा प्रणित सरकार आहे. त्याचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे. केंद्र सरकार हे लोकशाहीला न पचणारे अनेक निर्णय घेत आहे. जनभावनेचा आदर करून आरक्षणाची टक्केवारी वाढवून घेतली पाहिजे. याकरिता केंद्राने पुढाकार घ्यावा.
Breaking News: Balasaheb Thorat’s statement on Maratha reservation said