स्थानिक स्वराज्य निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार यावर बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य
Ahilyanagar Congress Balasaheb Thorat: महायुती सरकार सर्वच पातळीवर कुचकामी ठरलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दिसेल.
अहिल्यानगर: महायुती सरकार सर्वच पातळीवर कुचकामी ठरलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दिसेल. या निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्रित समोरे जाणार की, स्वतंत्र यावर लवकरच निर्णय होईल.
परिस्थिती पाहून निर्णय घेताना, वेळ वाया जाणार नाही, याची काळजी घेऊ, असे सांगून स्थानिकसाठी ‘मविआ’ची तयारी सुरू असल्याचे संकेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिले.
राज्यात आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. या निवडणुका मविआ म्हणून एकत्र लढवायच्या की, स्वतंत्र याबाबत बाळासाहेब थोरात यांनी मोठं विधान केलं.
अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा विस्तार, संघटन बांधणीसाठी पक्ष निरीक्षक तथा प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. थोरात म्हणाले, “काँग्रेस पक्षाचे संघटन वाढविले जाणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या परिणामानंतर काही कार्यकर्ते पक्षातून गेले असतील. पण काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. नवीन कार्यकर्ते तयार होतात. त्यामुळे संघटन थांबत नसते. पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन, त्यांच्याशी विचार-विनिमय करून पक्ष संघटनेच्या रिक्त जागा भरल्या जात असून राज्यात वेगवान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे”.
Breaking News: Balasaheb Thorat’s statement on Mahavikas Aghadi’s joint fight