सारथी वरून मराठा समाज आक्रमक, बाळासाहेब थोरात यांची गाडी अडवली
पुणे: मराठा क्रांती मोर्चा पुणेच्या वतीने सारथी स्वायत्तता अबाधित राखण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची गाडी अडवून मंत्री विजय वडेटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी पेट्रोल डीझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. पुण्यात हे आंदोलन संपल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी विशेष म्हणजे यामध्ये काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची गाडी अडवून मंत्री विजय वडेटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
याप्रसंगी सचिन आडेकर म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा क्रांतीचे ५८ मोर्चे झाले आहे. ४२ मराठा शहीद झाले आहेत. तेव्हा आरक्षण व सारथी संस्था स्थापन झाली. मात्र आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर सारथीच्या स्वायत्तता बाबतीत प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान थोरात यांनी याबाबत आपण लक्ष घालू व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देऊन आंदोलकांना शांत केले गेले.
Web Title: Balasaheb Thorat’s car was stopped