Balasaheb Thorat: थोरातांचे मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल मोठ विधान
संगमनेर | Balasaheb Thorat: राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून स्तुती केली आहे. सर्वाना समजून घेणारे व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे. राज्यातील तीन पक्षाचे सरकार टिकून राहण्यास आणि चांगले काम करण्यास मुख्यमंत्री ठाकरे यांचा स्वभाव हे प्रमुख कारण असल्याचे अशा शब्दात त्यांनी कौतुक केले आहे. यावेळी थोरात यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि डॉ. कदम यांच्या कामाचेही कौतुक केले.
स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाच्या सोळाव्या वर्षाचा आनंद मेळावा संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील कार डोंगरावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सदाशिव लोखंडे, दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रकल्पप्रमुख दुर्गा तांबे, रणजितसिंह देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे उपस्थित होते.
थोरात म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. हे सरकार पाडण्यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेऊन बसले आहेत, तर काही जण स्वप्नात बडबडत आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळणार नाही. सरकार टिकण्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा मोठा वाटा आहे, हे मान्यच करावे लागेल. सर्वांना समजून घेत, सोबत घेऊन चालणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेच आघाडी टिकण्यासाठी हातभार लागला आहे.
Web Title: Balasaheb Thorat Speech about Cm uddhav Thackarye