बाळासाहेब थोरात सभागृहात दिसत नाही, विरोधकांना चिमटे
Eknath Shinde: बाळासाहेब थोरात आज सभागृहात नाही, नाना पटोले तुम्ही तर २०८… म्हणजे थोडक्यात वाचले, असे चिमटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढले.
मुंबई : लोकभावनेची दिशा तुम्हाला कळली असती तर आज ही दशा झाली नसती. लोकांच्या मनात काय ते तुम्हाला कळलेच नाही, परिणामतः बाळासाहेब थोरात आज सभागृहात नाही, नाना पटोले तुम्ही तर २०८… म्हणजे थोडक्यात वाचले, असे चिमटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढले.
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी लोकांनी तुम्हाला नाकारले आहे हे वास्तव स्वीकारा, असे आवाहन विरोधकांना केले. काँग्रेसला ८० लाख मते मिळूनही १६ जागा कशा मिळाल्या, असा प्रश्न विरोधक करत आहेत. लोकसभेला आम्हाला ७३ लाख मते पडली; पण जागा ७च आल्या, तेव्हा तुम्हाला ईव्हीएम नाही आठवले का, असा सवाल त्यांनी केला.
लोकसभेला आम्ही कमी पडलो तेव्हा रडत नाही बसलो, तुम्ही विधानसभेला हरलात तर रडीचा डाव खेळत ईव्हीएमला दोष देताय. उगाच स्टंटबाजी करताय, आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, हे लक्षात घ्या, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केली.
मी २०८ मतांनी निवडून आलो म्हणून माझी टिंगलटवाळी केली जात आहे. जनतेने मला निवडून दिले आहे, त्यांनी दिलेल्या विजयाची अशी टिंगल का करता, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत सत्ताधारी यांना केला आहे.
Web Title: Balasaheb Thorat does not appear in the hall, pinches the opposition Eknath Shinde
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study