बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर
Badlapur Case Accused Akshay Shinde Died in Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्याला ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला. आरोपी अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून घेतली. पोलिसांच्या व्हॅन मधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसाची बंदूक हिसकावून घेत गोळीबार केली. यात आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला. त्याचा मृतदेह कळवा हॉस्पिटलमध्ये नेला आहे. तर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असल्याने त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेल्याची माहिती आहे. आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांच्या व्हॅनमधून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस व्हॅनमध्ये शेजारी पोलिस बसला होता. त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने पोलिसाची बंदूक हिसकावून घेत स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती सुरुवातीला मिळाली होती. पण त्यानंतर त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली. अक्षयने पोलिसांच्या बंदुकीने गोळीबार केला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या वेळी अक्षयच्या गोळीबारापासून वाचवण्यासाठी पोलीसांनीही गोळीबार केला. त्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बदलापूर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणातील आरोपी अक्षय शिंदेंने पोलिसांकडून पिस्तुल हिसकावून गोळीबार केला याबाबत विचारलं असता अक्षय शिंदेची आई म्हणाली, माझा मुलगा असं करुच शकत नाही. माझ्या मुलाबद्दल काहीही बोलतील, तो असं करुच शकत नाही. कामावर गेले तर रस्ता क्रॉस करतानाही मी त्याचा हात धरत असे. अक्षय शिंदे रस्ता क्रॉस करताना गाड्या येतात त्यांनाही घाबरत होता. तो कसा काय गोळीबार करेल? असा प्रश्न अक्षय शिंदेच्या आईने विचारला आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला अक्षय शिंदेच्या आईने फोनवरुन प्रतिक्रिया दिली.
Web Title: Badlapur Case Accused Akshay Shinde Died in Police Encounter
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study