Breaking News | Nanded: लोकसभा मतदार एका तरुणाने चक्क कुऱ्हाडीने ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र फोडल्याची गंभीर घटना.
नांदेड: नांदेड लोकसभा मतदार संघात एका तरुणाने चक्क कुऱ्हाडीने ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र फोडल्याची गंभीर घटना घटली आहे. भैय्यासाहेब येडके असे या तरुणाचे नाव आहे. त्याने आपण हे कृत्य बेरोजगारीला कंटाळून केल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेमुळे मतदान केंद्रांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतलं. पण त्यानं हे कृत्य का केलं हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. पण या घटनेमुळं या तरुणामध्ये निवडणुकीबद्दल एकूणच राग असल्याचं दिसून आलं आहे. अधिक चौकशीनंतर याच्यामागचं नेमकं कारण समजू शकेल.
माध्यमातील वृत्तानुसार, नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ या गावात हा प्रकार घडला असून भय्यासाहेब येडके हा तरुण या मतदारसंघात मतदानासाठी दाखल झाला. त्यानं आपल्यासोबत लपवून कुऱ्हाड आणली होती. केंद्रामध्ये दाखल झाल्यानंतर मतदान करण्याऐवजी त्यानं ईव्हीएममशिनवरच कुऱ्हाडीनं घाव घातले. यामुळं मशिनचं नुकसानं झालं.
Web Title: Ax injury on EVM machine itself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study