Avinash Kharshikar: जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन
Avinash Kharshikar: जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृद्य विकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले आहे. आज सकाळी १०:३० वाजता निधन झाले. त्यांच्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बऱ्याच दिवसांपासून त्याची प्रकृती ठीक नव्हती.
अभिनेते अविनाश खर्शीकर यांनी १९७८ साली चित्रपट सृष्टीतील कामकाजात सुरुवात केली होती. लफडा, सदन, अपराध, आई थोर तुझे उपकार, लपवा छपवी, माफीचा साक्षीदार असे अनेक प्रसिद्ध चित्रपट त्यांनी दिले आहेत.
मराठी कलाकारांत एक विनोदी अभिनेता म्हणून त्यानी आपली कारकीर्द गाजवली. हिंदी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका केलेली आहे. अभिनेते अविनाश खर्शीकर यांच्या निधनाने ९० व्या दशकातील काळ आठवतो. या लाडक्या अभिनेत्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Avinash Kharshikar passed Away