Home क्राईम मुलाने आईला प्रियकरासोबत पहिले नको त्या अवस्थेत अन घडले धक्कादायक

मुलाने आईला प्रियकरासोबत पहिले नको त्या अवस्थेत अन घडले धक्कादायक

Aurangabad Crime Shocking thing happened when the boy didn't want to see his mother with his boyfriend

औरंगाबाद | Aurangabad Crime: वैजापूर तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात ही घटना घडली आहे. प्रेमात अडसर ठरणाऱ्या ९ वर्षाच्या मुलाचा आईनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे समोर आले आहे. प्रेमासाठी चक्क स्वतः च्या ९ वर्षाच्या मुलाचा खून केल्याचे समोर आले आहे.

सार्थक रमेश बागूल (९) असे मृत मुलाचे नाव आहे. तर संगीता रमेश बागूल (३५) व तिचा प्रियकर साहेबराव माणिकराव पवार (५२) असे आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारातील जंगलातल्या दरीत १७ फेब्रुवारीला पोलिसांना एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. दरम्यान वैजापूर पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी रोजी संगीता रमेश बागूल यांनी आपल्या मुलाची अपहरणाची नोंद केली होती. त्यामुळे पोलिसांनी सापडलेल्या मृतदेहासोबतचे कपडे आणि इतर गोष्टी दाखवताच संगीता यांनी आपल्याच मुलाचे असल्याचे सांगितले.  पण ओळख पटली असली तरी खुनाचा आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

पण पोलिसांनी तपास सुरू करताच त्यांना हा खून आईनेच केल्याचा संशय आला आणि त्यांनी आईला ताब्यात घेतलं असता,  पोलीसान आपल्या खाक्या दाखवताच तिने मुलाने आपल्याला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले होते. त्यामुळे आपल्या प्रेमात अडसर ठरू नयेत म्हणून, प्रियकर साहेबराव माणिकराव पवार याच्या मदतीने मुलाचा खून केल्याची कबुली दिली आहे.

Web Title: Aurangabad Crime Shocking thing happened when the boy didn’t want to see his mother with his boyfriend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here