घरी सोडण्याच्या बहाण्याने मुलांना पळविण्याचा प्रयत्न
Shrigonda: महांडुळवाडीतील घटना : तरुणाची सर्तकता.
मांडवगण : शाळेतून घरी जाणाऱ्या लहान मुलांना घरी सोडण्याच्या बहाण्याने पळविण्याचा प्रयत्न एका जागरूक तरुणांमुळे फसला. हा प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील महांडुळवाडी येथे गुरुवारी (दि.२२) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.
गुरुवारी महाडुंळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील मुले शाळा सुटल्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा-मांडवगण रस्त्याने घरी चालले होते. त्यामुळे पाठीमागून लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी त्या मुलांना आमच्याबरोबर चला तुम्हाला घरी सोडतो, अशी बतावणी केली. त्या शाळकरी मुलांनी आम्ही इथे जवळच राहतो असे सांगितले. परंतु, तरुणांनी शाळकरी मुलांना बळजबरीने आहे.
दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न करताच मुलांनी आरडाओरडा केला. आवाज ऐकून काही तरी गडबड असल्याचे ओळखून जवळच राहणाऱ्या वस्तीवरील एका तरुणाने धाव घेतली. त्याने ही आमची मुले आहेत आम्ही त्यांना घरी सोडू, तुमचा काही संबंध नाही, तुम्ही चालते व्हा, असे म्हटले. त्यानंतर दुचाकीवरील तरुण भरधाव निघून गेले. या घटनेने विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकाराने परिसरातील सर्वच गावातील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी सावध राहण्याची गरज व्यक्त केली
Web Title: Attempting to abduct children on the pretext of leaving them at home