Home अहमदनगर अहिल्यानगर: शाळकरी मुलीचा विनयभंग करून अपहरणाचा प्रयत्न

अहिल्यानगर: शाळकरी मुलीचा विनयभंग करून अपहरणाचा प्रयत्न

Ahilyanagar Crime: शाळा सुटल्यावर घरी जात असलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग करून तीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली.

Attempted abduction of a schoolgirl by molesting her

राहुरी : शाळा सुटल्यावर घरी जात असलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग करून तीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, मुलीने प्रसंगावधान राखत आरडा ओरडा करून आपली सुटका करून घेतली. ही घटना राहुरी तालुक्यातील जांभळी शिवारात सायंकाळच्या सुमारास घडली.

राहुरी तालुक्यातील जांभळी शिवारात दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान एक अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी जात होती. त्यावेळी वावरथ येथील अनिकेत संजय बाचकर या तरुणाने त्या अल्पवयीन मुलीस मोटारसायकल आडवी लावली. त्या तरुणीचा हात धरून ‘तु मला आवडते, माझ्या गाडीवर बस’ असे म्हणवून तिला गाडीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणीने प्रसंगावधान दाखवत त्याचा हात हिसकावत ओरडा ओरडा करत आपल्या घराच्या वस्तीकडे पळ काढला. त्या ओढातानीत मुलगी खाली पडल्याने तीच्या हाताला मार लागला. ते पाहून त्या तरुणानेही तेथून धूम ठोकली.

दरम्यान, त्या मुलीने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला. या प्रकाराने ती अल्पवयीन मुलगी घाबरुन गेल्याने तिच्या आई वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अनिकेत संजय बाचकर या तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक समाधान फडोळ हे करत आहेत.

Web Title: Attempted abduction of a schoolgirl by molesting her

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here