Home अहमदनगर अहमदनगर: खासदारावर शाई फेकण्याचा प्रयत्न

अहमदनगर: खासदारावर शाई फेकण्याचा प्रयत्न

Attempt to throw ink on MP

नेवासा: सध्या कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव सुरु आहे. नेवासा तालुक्यात करोना संकटाला तोंड देण्यासाठी कोणत्याही ठोस उपाय योजना नसल्याच्या कारणातून शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.

 शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

नेवासा येथे आढावा बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी शाई शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने भर सभेत गोंधळ उडाला होता.

पंचायत समितीच्या सभागृहात सुरु असलेल्या बैठकीत हा प्रकार घडला आणि गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला.

यानंतर संजय सुखदान यांना सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठकीत बोलावून त्यांचे म्हणणे खासदार लोखंडे यांनी ऐकून घेतले.  

Web Title: Attempt to throw ink on MP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here