संगमनेर: हाणामारी, अंगावर स्कॉर्पिओ घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
Breaking News | Sangamner: अंगावर स्कॉर्पिओ घालून जीवे मारण्याचा प्रयत्न.
संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका गावात दोघा मुलांमध्ये झालेल्या वादातून त्यांच्यात संगमनेर बसस्थानकात हाणामारी झाली. त्यानंतर गुरुवारी (दि.१२) अंगावर स्कॉर्पिओ घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास निमोण नाका परिसरात घडली. यात रस्त्याने जाणारा १३ वर्षीय शालेय विद्यार्थी जखमी झाला असून चहाची टपरी, दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम शहर पोलिस ठाण्यात सुरू होते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी माहिती देताना सांगितले, तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका गावात दोघा मुलांमध्ये वाद झाले होते. हे वाद त्यांच्या पालकांनी मध्यस्थी करून मिटवले. मात्र, संगमनेर बसस्थानकात त्यांच्यात हाणामारी झाली. यावेळी इतरही काही मुलेही उपस्थित होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास काही मुले शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक-पुणे महामार्गाने काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आली. चालकाने स्कॉर्पिओ भरधाव घेऊन ती निमोण नाका परिसरात नेली, त्यावेळी तेथील चहाच्या गाडीला जोराची या वाहनाचा धडक बसली. वादाशी काहीही संबंध नसलेला रस्त्याने जाणारा १३ वर्षीय शालेय विद्यार्थी स्कॉर्पिओच्या धडकेने गंभीर जखमी झाला, त्याचा पाय प्रक्चर झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
Web Title: attempt to kill by putting a scorpion on the body
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study