Home अकोले अकोले तहसील कार्यालयातील कारकून ४ हजार रु.ची लाच घेताना अटकेत

अकोले तहसील कार्यालयातील कारकून ४ हजार रु.ची लाच घेताना अटकेत

अकोले: अकोले येथील तहसील कार्यालयात असलेला कारकून आज दुपारी लाच घेताना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात अडकला. निवृत्ती मारुती भालाचीम या कारकुनास अटक करण्यात आली.

वर्ष २०१७ मध्ये खरेदी केलेल्या जमिनीची चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी चार हजार रु. ची लाच घेताना अकोले तहसीलचे अव्वल कारकून निवृत्ती भालचीम यांस लाचलुचपत अहमदनगर विभागाचे पथकाने रंगेहाथ पकडले आणि त्यास अटक केली आहे.

अहमदनगर लाचलुचपत पोलिस अधिक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दिपक करांडे, तनवीर शेख, सतिष जोशी, रमेश चौधरी, प्रशांत जाधव यांच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

तक्रारदार यांनी २०१७ मध्ये नव्याने खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफार मध्ये झालेली चुकीची नोंद दुरुस्तीसाठी तलाठी लिंगदेव यांनी तहसील कार्यालयात पाठविलेल्या महसूल जमीन अधिनियम कलम १५५ प्रमाणेच्या प्रकरणाचा निकाल देण्यासाठी आरोपी अव्वल कारकून निवृत्ती मारुती भालचिम रा.धुमाळवाडी ता.अकोले यांनी दिनांक १८/०६/२०१९ रोजी तडजोडी अंती ४००० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

Website Title: Attacks in a bribe of 4 thousand rupees in Akole tehsil office

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here