व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला, आढळली पिस्तूल, तलवार
Breaking News | Ahmednagar: घटनास्थळी तलवारीसारखी एक वस्तू व पिस्तूल.
अहमदनगर : अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवर धीरज मदनलाल जोशी (वय ५३) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. हल्ल्याचे कारण समजू शकलेले नाही. व्यापाऱ्यावर हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी पिस्तूल व धारदार शस्त्र आढळून आले.
अधिक माहिती अशी की, जोशी हे किर्लोस्कर वसाहतीत राहतात. त्यांचे शहरात रामचंद्र खुंट येथे मिठाईचे दुकान आहे. रात्री दुकान बंद केल्यानंतर ते दुचाकीवरुन घरी चालले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांचेवर हल्ला केला, त्यांचे हातावर वार करण्यात आले. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटना घडलेल्या ठिकाणी तलवारीसारखी एक वस्तू व पिस्तूल पडलेला दिसत आहे. हल्लेखोर नंतर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचेसह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.
Web Title: attack on trader, pistol, sword found
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study