गुन्ह्यातील आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला
Breaking News | Ahmednagar: दोन गाड्यांच्या काचा फोडल्या, नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल.
जामखेड : फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या जामखेड पोलिसांच्या खासगी वाहनावर आठ ते नऊ जणांनी हल्ला करीत काचा फोडल्या. पोलिसांवरही हल्ला करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांनतरही जामखेड पोलिसांनी प्रसंगावधान राखून आरोपीस ताब्यात घेतले.
या प्रकरणी अभिषेक सावंत, ईश्वर चाळक, राहुल चाळक, सौरभ चाळक, रोहित चाळक, मुन्ना बचाटे व इतर तिघे (सर्व रा.लाहुरी, ता.केज, जि. बीड) अशा नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी केज तालुक्यातील लाहुरी या आपल्या गावात आल्याची माहिती जामखेड पोलिसांना मिळाली. त्या नुसार जामखेड पोलिस पथकातील हवालदार प्रवीण इंगळे, कुलदीप घोळवे हे खासगी चारचाकी वाहनाने १६ फेब्रुवारी रोजी रात्री अडीच वाजता लाहोरी येथे पोहचले.
त्यांनी मदतीसाठी केज पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार वाघमारे यांनाही सोबत घेतले. यावेळी गावात २० ते २५ इसम चारचाकी वाहनाच्या बोनेटवर केक ठेऊन वाढदिवस साजरा करत होते. याठिकाणी फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी प्रतिक भैरवनाथ चाळक यास जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले. ते त्याला गाडीत बसवून घेऊन जात असताना, तेथे असलेल्या लोकांनी पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग केला. केज शहरातील शिवाजी चौकात हे वाहन अडवून आठ ते नऊ जणांनी हातात दगड, लोखंडी रॉड घेऊन गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या. – तसेच पोलिसांना दमदाटी व मारहाण करत गाडीतील आरोपीस बाहेर ओढण्याचा – प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखून सदर गाडी केज पोलिस ठाण्यात आणली.
जामखेड पोलिस ठाण्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर विठ्ठल बेल्हेकर यांच्या – फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारांनतरही आरोपी प्रतिक चाळक यास जामखेड पोलिस ठाण्यात आणून अटक करण्यात आली.
Web Title: Attack on the police who went to arrest the accused in the crime
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study