नगरमधील एका कोव्हीड सेंटरवर गुंडांचा हल्ला, नेटला लावली आग
अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड येथे असलेल्या साई स्पंदन कोविड सेंटरवर काही गुंडांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. डॉक्टरांनाही धक्काबुकी, जीवे मारण्याची धमकी दिली तसेच सेंटर समोरील नेटला आग लावली.
मार्केट यार्ड येथील साई स्पंदन कोविड सेंटर बंद करावे या हेतूने सहा आरोपींनी सेंटरसमोर असलेल्या हिरव्या नेटला आग लावली. त्यामुळे लोक सैरा वैरा पळू लागले. पार्किंग केलेली वाहने ढकलून देण्यात आली. तसेच डॉक्टरांना धमकी देण्यात आली. घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथून आरोपी मात्र पसार झाले होते.
कोव्हीड सेंटर चालविणारे डॉ. रोहित रमेश आहेर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून कृष्णा दळवी, विजय आसाराम रासकर, विनायक कुलकर्णी, दीपक लक्ष्मण पवार, आकाश रासकर, ऋषिकेश रासकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: attack-on-a-covid-center-in-ahmednagar