जिल्ह्यातील एटीएम मशिन फोडणारी टोळी जेरबंद
Ahmednagar News Live | ATM Theft | अहमदनगर: एटीएम मशीन फोडणारे तिघे आरोपी अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.
सनी सूरजसिंग भोंड (वय २५, रा. संजयनगर, काटवन खंडोबा, अ.नगर), चिक्या उर्फ रोहित निवृत्ती मेहेत्रे (वय २५, रा. माळीवाडा) व सोनू सूरजसिंग भोंड (रा. काटवन खंडोबा) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी एटीएम फोडून चोरीच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच पाईप लाईन रोडवर एकाच दिवशी दोन एटीएम फोडले होते.
त्यात परत शहरातील माळीवाडा परिसरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता.मात्र यावेळी चोरट्यांचा तो प्लॅन फसला अन अवघ्या२४तासाच्या आत ही टोळी पोलिसांनी जेरबंद केली.
दि. १३ जानेवारी २०२२ रोजी माळीवाडा येथील एसबीआयचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता. सनी भोंड हा एटीएम मशिन ओढताना आढळून आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पसार झालेल्या चिक्या उर्फ रोहित निवृत्ती मेहेत्रे व सोनू सूरजसिंग भोंड या दोघांनाही अटक केली.
Web Title: ATM machine-breaking and theft gang arrested in Ahmednagar