Home नाशिक कसारा घाटाच्या पायथ्याशी..मिळाले चक्क दोन कोटींचे घबाड

कसारा घाटाच्या पायथ्याशी..मिळाले चक्क दोन कोटींचे घबाड

Kasara Ghat News: नाशिक हून मुंबई कडे जाणारे चारचाकी वाहनात (MH 11 BV 9708) दोन कोटींची रक्कम मिळून आली. 

At the foot of the Kasara ghat two core cash

कसारा: निवडणुकीच्या धामधुमित मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलीसांनी बुधवार (दि.30) रोजी नाकाबंदी दरम्यान नाशिक हून मुंबई कडे जाणारे चारचाकी वाहनात (MH 11 BV 9708) दोन कोटींची रक्कम मिळून आली.

शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंतामण पोलिस चौकी जवळ स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी करत असताना (MH 11 BV 9708) या वाहनात रोख रक्कम आढळून आली आहे. अंदाजे दोन कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम असल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे. सदर वाहन ताब्यात घेऊन भरारी पथकांकडून पैसे मोजण्याचे काम सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव व निवडणूक भरारी पथका कडून अधिक तपास सुरु आहे. पुन्हा एकदा मोठी रक्कम आढळून आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: At the foot of the Kasara ghat two core cash

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here