लाच घेताना सहायक पोलिस उपनिरीक्षक जाळ्यात- Bribe Case
Breaking News | Dhule Bribe Case: ४० हजार रुपयांची लाच घेताना धुळ्यातील आझादनगर पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस उपनिरीक्षकास रंगेहात पकडण्यात आले.
धुळे: न्यायालयीन कामकाजासाठी सकारात्मक अहवाल देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना धुळ्यातील आझादनगर पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस उपनिरीक्षकास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी केली. आरिफ अली सय्यद (वय ५१) असे अटक केलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सय्यद हा दुसऱ्यांदा ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकला.
न्यायालयात सकारात्मक अहवाल देण्याकरिता आरोपी सय्यद यांनी तक्रारदाराकडे ५० हजारांची लाच मागितली. त्यामुळे ‘एसीबी’कडे तक्रार करण्यात आली.
त्यानंतर लाच लुजपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला असता या सापळा दरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्यास लाचेची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात ताब्यात घेतला आहे.
Web Title: Assistant police sub-inspector nabbed for taking bribe
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study