Home महाराष्ट्र सहायक पोलिस निरीक्षक फौजदारासह ‘लाचलुचपतच्या जाळ्यात

सहायक पोलिस निरीक्षक फौजदारासह ‘लाचलुचपतच्या जाळ्यात

अवैध दारु वाहतूकच्या गुन्ह्यात मदत आणि पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी एक लाख रुपयाची लाच (Bribery) मागितल्याप्रकरणात आध ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक आणि सहायक फौजदारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  जाळ्यात अडकले आहे.

Assistant police inspector along with Faujdar 'in the net of bribery

सातारा : अवैध दारु वाहतूकच्या गुन्ह्यात मदत आणि पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी एक लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणात आध ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक आणि सहायक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.  यामध्ये लाच स्वीकारताना फौजदार रंगेहाथ सापडला. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.  ही कारवाई शुक्रवारी दुपारी औंध मध्येच झाली. तर या कारवाईने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  या घटनेतील तक्रारदाराच्या परमीट रूममधून दारुची अवैध वाहतूक केल्याने आध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता. या गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करणे आणि येथून पुढे त्रास न देण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तडजोडीअंती एक लाख देण्याचे ठरले. यानंतर तक्रादाराने सातारा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी करुन शुक्रवारी आध, ता. खटाव येथे सापळा लावला. दुपारी चारच्या सुमारास जुना एसटी बसस्थानक बाजार पटांगणात सहायक फौजदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. संबंधिताचे नाव बापूसाहेब नारायण जाधव (वय ५४) असे आहे. तर सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव दत्तात्रय परशुराम दराडे असे आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आध पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सातारा लाचलुचपतच्या पोलिस उपअधीक्षक उज्वल वैद्य, हवालदार नीलेश चव्हाण, तुषार भोसले, नीलेश येवले आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Assistant police inspector along with Faujdar ‘in the net of bribery

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here