संगमनेर: सहायक पशुधन विकास अधिकारी निलंबित
पशुधन विकास अधिकारी निलंबित (Suspended), सेवा मिळत नाही ; ग्रामस्थांनी केल्या होत्या तक्रारी, प्रस्ताव पाठवूनही कारवाई नाही.
संगमनेर: तालुक्यातील चंदनापुरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहायक पशुधन विकास अधिकारी संजय निकाळे यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी (दि.१) तसे आदेश बजावले आहेत. कारवाईचा प्रस्ताव पाठवूनही गेल्या अनेक दिवसांपासून कुठलीच कारवाई झाली नव्हती.
३० ऑगस्टला चंदनापुरी गावात ग्रामसभा झाली होती. यावेळी पशुसंवर्धन विभागाचा आढावा देण्यासाठी सहायक पशुधन विकास अधिकारी संजय निकाळे गैरहजर होते. त्यामुळे या विभागाच्या अडीअडचणी ग्रामस्थांना मांडता आल्या नाहीत. ते कार्यालयात कायमस्वरुपी उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांना लम्पी आजाराबाबत माहिती मिळाली नाही. तसेच त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सेवा मिळत नसल्याने त्यांची बदली करावी. अशा मागणीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. हा ठराव संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना पाठविला होता. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांकडे दोषारोपपत्र पाठविले होते.
निकाळे यांच्या वर्तनामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी निकाळे यांना सेवेतून निलंबित केल्याचा आदेश बजावला.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे अवमान करणे, पशुवैद्यकीय दवाखाना चंदनापुरी येथे सेवा देण्यासाठी वेळेवस उपस्थित न राहणे, कामकाजात हलगर्जीपणा करणे, वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी यांना अरेरावीची भाषा वापरणे व धमकी देणे. या प्रकारच्या निकाळे यांच्या गैरवर्तणुकीचेबाबत दोषारोपपत्र प्राप्त झाल्याने त्यांचे निलंबन केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी सांगितले.
Web Title: Assistant Livestock Development Officer at Chandnapuri suspended
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App