पवारांनी शिवसेना फोडली, छगन भुजबळांच्या आरोपांवर शरद पवारांनी दिलं उत्तर….
Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यातच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. ‘छगन भुजबळ म्हणत आहेत की, शिवसेना पहिल्यांदा फुटली, ती पवारांनीच फोडली.
Sharad Pawar on Chhagan Bhujbal: ‘पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवारांनी केले’, असे म्हणत छगन भुजबळशरद पवारांवर घेरले. भुजबळांनी केलेल्या आरोपावर शरद पवारांनी भूमिका मांडली. ज्यावेळी भुजबळांसह काही आमदार फुटले, त्यावेळची घटना पवारांनी सांगितली आणि भुजबळांनाच उलट सवाल केला. ‘छगन भुजबळ म्हणत आहेत की, शिवसेना पहिल्यांदा फुटली, ती पवारांनीच फोडली. माझ्यात काही ताकद नव्हती शिवसेना फोडण्याची, पवारांमुळेच शिवसेना फुटली’, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला.
“मी शिवसेनेत नव्हतो, माझी जबाबदारी काय?” या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “मी कोणत्या पक्षात होतो? मी शिवसेनेत नव्हतो. त्यामुळे माझी जबाबदारी काय? मी आमचा जो विरोधी पक्ष आहे, त्याला शक्ती द्यायचं काम माझं आहे की, त्याला कमकुवत करण्याचं काम माझं आहे?”, असा उलट प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. शरद पवार पुढे म्हणाले की, “आमचा पक्ष हा मजबूत करायचा असेल, तर त्या पक्षाला काम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, ज्या संघटना आहेत. त्यांच्यावर आमचा आघात राहणार. त्यातून आपली शक्ती वाढेल कशी याची खबरदारी घ्यायची.”
शरद पवार “ज्यावेळी आम्हाला लक्षात आलं की, छगन भुजबळ आणि त्यांचे काही सहकारी त्या पक्षात (शिवसेना) अस्वस्थ आहेत आणि बाहेर पडायच्या नादात आहे. संपर्क साधू इच्छितात. जरूर आम्ही संपर्क साधला आणि त्यामध्ये चुकीचे काही नाही”, असे शरद पवार छगन भुजबळ यांच्या आरोपाला उत्तर देताना म्हणाले.
छगन भुजबळांचं आरोप काय?
“१९९१ मध्ये शिवसेना फोडण्याच पुण्यकर्म शरद पवार यांनीच केले. मी शिवसेना फोडू शकत नव्हतो. ३६ लोकांची स्वाक्षरी झाल्यानंतर मी शेवटी स्वाक्षरी केली. कुठलाही दोष नसताना मला तेलगी प्रकरणात गोवण्यात आले अधिकाऱ्यांमधील वाद होते. मला राजीनामा द्यायला लावला”, असे भुजबळ शरद पवारांबद्दल बोलताना म्हणाले.
Web Title: Assembly Elections Sharad Pawar broke Shiv Sena, Sharad Pawar responded to Chhagan Bhujbal’s allegations
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study