हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा भाजपात प्रवेश
Maharashtra assembly Elections 2024: पंजाबराव डख यांनी भाजपात प्रवेश करुन कमळाचा गमछा गळ्यात घातला.
परभणी: विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राज्यातील दिग्गज नेत्यांच्याही सभांचा धडाका सुरू आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख यांनीही अनेकांचा अंदाज चुकवत काल भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासाठी ते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र, त्यांच्या या पक्ष अनेकांच्या प्रवेशाने उंचावल्या आहे.
भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पंजाबराव डख यांनी भाजपात प्रवेश करुन कमळाचा गमछा गळ्यात घातला. हवामान तज्ञ अशी ओळख असलेल्या पंजाबराव डख यांच्या भाजप प्रवेशाने अनेकांच्या भुवया भुवया उंचावल्या आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश करुन निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगितले आहे. आता जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार तथा उमेदवार मेघना बोर्डीकर यांचा प्रचार ते करणार आहेत. पंजाब डख यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता वंचित सोडून ते भाजपमध्ये गेले आहेत आणि भाजपचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, वंचितचा अंदाज चुकल्याने ते आता भाजपात गेल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.
Web Title: assembly Elections Meteorologist Punjabrao Dakh joins BJP
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study