Home संगमनेर अपक्ष उमेदवाराचे संगमनेरमधून अपहरण मात्र….

अपक्ष उमेदवाराचे संगमनेरमधून अपहरण मात्र….

Breaking News | Sangamner Assembly Elections: छत्रपती संभाजीनगर मधून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेदवाराचे रविवारी दुपारी संगमनेरमधून अपहरण (Kidnap).

Assembly Elections Independent candidate abducted from Sangamner

संगमनेर : छत्रपती संभाजीनगर मधून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेदवाराचे रविवारी दुपारी संगमनेरमधून अपहरण करण्यात आले आहे. याबाबत पुढील तपासासाठी हा गुन्हा संगमनेर पोलिसांनी शिर्डी पोलिसांकडे वर्ग केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी दिली आहे.

 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे उमेदवार राजू धर्माजी शिंदे हे त्यांची पत्नी, बहीण, मेहुणे आणि सहकारी मंगेश जाधव, स्वप्निल शिरसाठ व चालक सुहास बागुल यांच्यासह शुक्रवारी शिर्डीत आले होते. रविवारी दुपारी अडीच वाजता ते आपल्या वाहनांमधून नाशिकला जाण्यासाठी संगमनेरमार्गे निघाले. दर्शन घेऊन ते आपल्या कुटूंबासह शिर्डी विमानतळ मार्गे ते संगमनेरकडे येत होते. यावेळी त्यांचा पाठलाग करण्यात येत होता. संगमनेर तालुक्यातील समनापूर गावाजवळ त्यांच्या (एम.एच. ०४ जी.एम. ४०४१) या गाडीला क्रेटा गाडी आडवी लाऊन गाडीतील सात ते आठजण खाली उतरले. त्यांनी वाहनाला घेराव घालत राजू शिंदे यांना दुसऱ्या चारचाकी वाहनात बसवून त्यांचे अपहरण केले.

मंगेश काशिनाथ जाधव (रा. करोडी, छत्रपती संभाजीनगर) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अपहरणाचा गुन्हा दाखल केला. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर राजू शिदे यांचे अपहरण झाले आहे. ऐन माघारीच्या आदल्या दिवशी अपक्ष उमेदवाराचे अपहरण करण्यात आल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पातळीवरून या संदर्भात विचारणा सुरू होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. दरम्यान, अहमदनगर पोलीस दल आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक यांनी समृद्धी महामार्गावर या अपक्ष उमेदवाराचा शोध घेण्यासाठी महामार्गावर विविध पथके तैनात केली. झिरो नंबरने हा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

दरम्यान, अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचे अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. मात्र संबंधित अपहृत उमेदवाराने मेसेज व्हायरल करून आपले अपहरण झाले नाही. आपण सुरक्षीत असल्याचे संदेश अनेकांना पाठवले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली.

Web Title: Assembly Elections Independent candidate abducted from Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here