मोठी बातमी! महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा धक्का
Maharashtra Assembly Elections 2024: भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. हा भाजप पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
नंदुरबार: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून डॉ. हीना गावित अपक्ष निवडणूक लढवत आहेत. अक्कलकुवा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी त्या आग्रही होत्या. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिंदे गट विरोधात काम करत असल्यामुळे मी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मी खासदार असताना अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघात अनेक विकासाचे कामे केलेले आहेत. मी केलेल्या विकास कामांचा फायदा मला मतदार मतदानाच्या स्वरूपात देणार, मी निवडणूक लढत जिंकणार आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
आता डॉ. हिना गावित यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे. शिंदे गट वारंवार भाजपाच्या विरोधात काम करत असल्यामुळे मी शिंदे गटाच्या विरोधात उमेदवारी करत आहे, असे हिना गावित यांनी सांगितले आहे. हिना गावित यांनी भाजपला रामराम ठोकल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला नंदुरबारमध्ये मोठा धक्का बसलाय.
Web Title: Assembly Elections Biggest blow to BJP in Maharashtra
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study