Home बीड शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात…..

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात…..

NCP Sharad Pawar Third Candidate List : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक.

Assembly Elections 2024 Third list of Sharad Pawar's NCP announced 

Maharashtra Assembly Elections 2024: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२७ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये ९ जणांची उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

कोणाला कोठून मिळाली संधी?

वाशिममधील कारंजा-ज्ञायक पाटणी, हिंगणघाट-अतुल वांदिले, नागपूरमधील हिंगणा-रमेश बंग, अणुशक्तीनगर-फहद अहमद, चिंचवड-राहुल कलाटे, भोसरी-अजित गव्हाणे, माजलगाव-मोहन जगताप, परळी-राजेसाहेब देशमुख, मोहोळ-सिद्धी रमेश कदम यांच्यासह आदी जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होणार आहे.

Web Title: Assembly Elections 2024 Third list of Sharad Pawar’s NCP announced 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here