संगमनेर मतदारसंघात काय होणार, कोण बनणार पुढचा आमदार? काय सांगतो पोल व तज्ञांचे मत
Sangamner Assembly Election 2024: जनतेचा कौल हा मतपेट्यांमध्ये कैद झाला असून येत्या 23 तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार.
Sangamner Politics News : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू होती. काल अखेरकार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा मतपेट्यांमध्ये कैद झाला असून येत्या 23 तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
यामुळे या मतमोजणी मध्ये नेमके काय होणार, महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार, महायुतीला पुन्हा कौल मिळणार की महाविकास आघाडी लोकसभेप्रमाणे उलटफेर करणार अशा अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. सोबतच, आता विविध संस्थेचे एक्झिट पोल देखील समोर येत आहेत.
यातील काही एक्झिट पोल मध्ये महायुतीला आणि काही एक्झिट पोल मध्ये महाविकास आघाडीला बहुमत दाखवले जात आहे. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ असून सत्ता स्थापित करण्यासाठी 145 जागा आवश्यक आहेत. पण महायुती या मॅजिकल फिगर पर्यंत पोहोचणार की महाविकास आघाडी ? हे सार काही 23 तारखेला क्लिअर होणार आहे.
तत्पूर्वी मात्र एक्झिट पोल मध्ये राज्यातील विविध मतदार संघांमध्ये कोण विजयी होणार? याबाबत अंदाज बांधला जात आहे. या एक्झिट पोलमध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघाबाबतही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संगमनेर विधानसभा मतदार संघात बाळासाहेब थोरात विरुद्ध अमोल खताळ अशी लढत होत आहे. पण खऱ्या अर्थाने सुजय विखे यांनी ताकद दिली आहे. सुजय विखे यांच्या झालेल्या पाच सहा सभा आणि त्यामुळे निर्माण झालेली वातावरण निर्मिती झाली तसेच बाळासाहेब थोरात यांनी लावलेली ताकद, त्यांची मुलगी जयश्रीताई थोरात मैदानात येऊन केलेला प्रचार, मधल्या काळामध्ये घडलेल्या घडामोडी, मतदानाचा वाढलेला टक्का या सगळ्या गोष्टी सांगतात बाळासाहेब थोरातांच्या विरोधामध्ये वातावरण तयार झालेले आहे मात्र आता ४० वर्ष असलेली सत्ता आणि आता नवखे म्हणून समोर आलेले अमोल खताळ यांच्यामध्ये नेमकी लढत कशी होतेय अर्थात वन साईड लढत होईल असे म्हणताच येणार नाही. त्याठिकाणी देखील ५०-५० वातावरण आहे असे म्हणले तरी चुकीचे ठरणार नाही. पण आता या मतदारसंघातून कोण आमदार होणार? हा मोठा सवाल आहे. याचे उत्तर साहजिकच मतमोजणीच्या दिवशी मिळणार आहे. यामुळे आता या मतदारसंघात मतमोजणीच्या दिवशी काय होते, हे पाहणे उचित ठरणार आहे.
संगमनेरकर नोंदवा आपले मत अन जाणून घ्या कोण होणार तालुक्याचा आमदार. शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये.
पहा कोण होणार तालुक्याचा आमदार
Web Title: Assembly Election What will happen in Sangamner constituency
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study