Exit Poll: ‘या’ मतदारसंघात ‘हे’ उमेदवार होणार विजयी, यादीच आली समोर
Assembly Election 2024: या मतदारसंघात हे उमेदवार जिंकणार
Vidhansabha Election 2024 Exit Poll: ‘या’ 15 महत्त्वाच्या मतदारसंघात हे उमेदवार जिंकणार
- बारामती- महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ हा बारामती आहे. जिथे पवार विरुद्ध पवार असा सामना होता. पण या लढाईत काका अजित पवार हे पुतण्या युगेंद्र पवारवर भारी पडणार असा अंदाज प्रजातंत्रच्या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.
- सकोली- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे साकोलीतून विजयी होती असं सर्व्हेत म्हटलं आहे.
- कोपरी-पाचपाखाडी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी-पाचपाखाडी हा मतदारसंघ बालेकिल्ला असून तेच पुन्हा येथून निवडून येतील असा अंदाज सर्व्हेत वर्तविण्यात आला आहे.
- नागपूर दक्षिण-पश्चिम- मुख्यमंत्र्यांप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला मतदारसंघ मजबूतपणे बांधला आहे. त्यामुळे नागपूर द. प. मतदारसंघातून पुन्हा फडणवीस विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- वरळी- मुंबईतील सगळ्यात महत्त्वाचा असा समजला जाणारा वरळी हा मतदारसंघ राखण्यात आदित्य ठाकरेंना यश येईल असं सर्व्हेत म्हटलं आहे.
- वांद्रे पूर्व- ‘मातोश्री’च्या अंगणात शिवसेना (UBT)चा भगवा फडकणार असं सर्व्हेत म्हटलं आहे. कारण येथून वरुण सरदेसाई हे जिंकतील असं सर्व्हेत म्हटलं आहे. असं झाल्यास झिशान सिद्दीकी यांना हा मोठा धक्का असू शकतो.
- दादर-माहिम- महाराष्ट्रातील सर्वात चर्चेमध्ये असणाऱ्या मतदारसंघामध्ये दादर-माहीम हा मतदारसंघ आहे. ज्यामध्ये शिवसेना (UBT) चे महेश सावंत हे विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असं झाल्यास ते खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरू शकतात. कारण याच मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
- राहाता-शिर्डी- शिर्डी मतदारसंघ पुन्हा राखण्यात भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखेंना यश येईल असं सर्व्हेत म्हटलंय.
- परळी वैजनाथ- मराठवाड्यातील सर्वात चर्चेत असणारा परळी मतदारसंघ हा धनंजय मुंडे यांच्याकडेच राहीलं असा अंदाज सर्व्हेत दिला आहे.
- इंदापूर- दोन निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या हर्षवर्धन पाटलांना पुन्हा इंदापूर काबीज करण्यात यश येईल असं सर्व्हेत म्हटलं आहे. जो दत्तात्रय भरणेंना धक्का असू शकतो.
- येवला- आपला पारंपारिक मतदारसंघ राखण्यात छगन भुजबळांना यश मिळू शकतं असा अंदाज या सर्व्हेत देण्यात आला आहे.
- मानखुर्द-शिवाजीनगर- मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून अबु आझमी जिंकू शकतात. खरं तर नवाब मलिक यांनी इथून अबू आझमींना आव्हान उभं दिलं आहे. पण आझमी ही जागा राखतील असं सर्व्हेत म्हटलंय.
- संभाजीनगर प- येथून राजू शिंदे हे विजय मिळवतील असा अंदाज देण्यात आला आहे. असं झाल्यास शिवसेना शिंदे गटाच्या संजय शिरसाठ यांना मोठा धक्का बसू शकतो.
- कुडाळ- कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईक हे पुन्हा निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- भूम-परांडा- राष्ट्रवादी काँग्रेस राहुल मोटे हे मंत्री महोदय तानाजी सावंताचा पराभव करू शकतात असं सर्व्हेत म्हटलंय.
Web Title: Assembly Election candidate will win in this constituency, the list has come out
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study