Home क्राईम संगमनेर: अल्पवयीन मुलीला दमबाजी; युवकाला कारावासाची शिक्षा

संगमनेर: अल्पवयीन मुलीला दमबाजी; युवकाला कारावासाची शिक्षा

Sangamner Crime: शहरातील शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी येणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला दमबाजी.

Assaulting a minor girl Youth sentenced to imprisonment

संगमनेर: तालुक्यातील एका खेडेगावातून शहरातील शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी येणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला दमबाजी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाला न्यायालयाने सहा महिने सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी हा शुक्रवारी (दि. १६) हा निकाल दिला.

अक्षय शिवाजी काळे (रा. संगमनेर) असे शिक्षा सुनावलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना २०१९ मध्ये घडली होती. अल्पवयीन मुलगी एस. टी. बसने शहरातील शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्यासाठी यायची. त्यावेळी काळे हा तिला वारंवार भेटून त्रास द्यायचा. माझ्याशी बोल, नाहीतर तुझ्या घरच्यांना मारून टाकेन’ असा दम तो मुलीला द्यायचा, त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून तिने विषारी द्रव्य सेवन केल्याने उपचारार्थ तिला संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला  होता.

सदर गुन्ह्याचा तपास येथील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी केला. त्यांनी काळे विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. अतिरिक्त सह. जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली होती. सरकारी वकील म्हणून अॅड. संजय वाकचौरे यांनी काम पाहिले.

एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलीची साक्ष महत्त्वपूर्ण धरून न्यायाधीश मनाठकर यांनी आरोपी काळे दोषी ठरवून सहा महिने सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून ७ हजार ५०० रुपये पीडित मुलीला देण्यात यावेत. असेही न्यायालयाच्या निकालात म्हटले आहे.

Web Title: Assaulting a minor girl Youth sentenced to imprisonment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here