Home नाशिक पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला; हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार

पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला; हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार

Breaking News | Nashik Crime: पोलीस उपनिरीक्षकावर थेट हल्ला झाल्याने पंचवटीत खळबळ.

Assault on police sub-inspector in Panchvati

नाशिक | पंचवटी: पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस उपनिरीक्षकावर थेट हल्ला झाल्याने पंचवटीत खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलीस अधिकार्‍यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंचवटी पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. पंचवटी परिसरात दुसर्‍यांदा पोलीस अधिकार्‍यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पंचवटी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अभिमान नेमाणे हे नेहमीप्रमाणे आपली ड्युटी करून सोमवारी (दि. ११) रात्री १० वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरून घरी जात होते. वज्रेश्वरी झोपडपट्टी परिसरात दोन मद्यपी रस्त्यावर धिंगाणा घालत असल्याचे नेमाणे यांना दिसले. यावेळी नेमाणे यांनी त्यांना हटकले. राग अनावर झाल्याने मद्यपींनी दगडाने नेमाने यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. या हल्ल्यात नेमाणे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, गुन्हे शोध पथकाच्या टीमला संशयितांच्या मागावर पाठवून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Assault on police sub-inspector in Panchvati

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here